हडोळती येथे 75 वर्षाच्या वृद्धाकडून चालवला जात होता वेश्याव्यवसाय, पोलिसांनी केली अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अहमदपूर तालूक्यातील मौजे हडोळती येथे एका 75 वर्षाच्या वृध्दाकडून वेश्याव्यवसाय चालवण्यात येत होता. पोलिसांनी धाड टाकून या प्रकरणी तिन महिलांसह एका पुरुषास ताब्यात घेतले. अहमदपूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मौजे हडोळती येथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. हडोळती येथील बाभळदरा रोडवरील दुमजली इमारतीवर पोलीसांनी छापा मारला. सुभाष पुंडाजी पवार हा तिथे वेश्याव्यवसाय चालवत होता.

नांदेड जिल्ह्यातील येलदरी तांडा येथील एक महिला, अहमदपूर येथे राहणारी एक महिला आणि मिरारोड भार्इंदर ठाणे येथील एक महिला त्या ठिकाणी वेश्याव्यवसाय करण्यासाठी आणलेल्या होत्या. 2150 रुपयांचे साहित्य ज्यामध्ये रोख रक्कम, मोबाईल आणि चार बॉक्स कंडोम पोलिसांनी जप्त केले. अहमदपूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.