नात्याची नवी परिभाषा !

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑस्कर वाइल्डने म्हटले होते की स्त्री पुरुषात सर्व प्रकारची नाती असू शकतात. परंतु केवळमैत्री असू शकत नाही. मनोविश्लेषक सांगतात जेव्हा दोन भिन्नलिंगी व्यक्ती एकमेकांबाबतआकर्षण अनुभवतात तेव्हा त्यांचे नाते त्यांच्या मानसिक स्वभावधर्मानुसार आकार घेऊलागते.पूर्वी स्त्रियांचे घराबाहेर पडणेच खूप अवघड होते. पण आजची स्त्री पुरुषाच्याबरोबरीने कर्तुत्व गाजवत आहे. घरापेक्षाही तिचा वेळ कार्यालयात अधिक जात असतो.कामाची संस्कृतीही विकसित होते आहे. त्यामुळे सोबत काम करताना सहकाऱ्यांशीभावनिक बंध जुळणे यात गैर काहीच नाही. पूर्वी कार्यालयीन वेळ ६ किंवा आठतासांपुरतीच मर्यादित असणे अपेक्षित होते. पण आज अनेक क्षेत्रांमध्ये वेळेचे बंधन पाळणेहेच मुळी हास्यास्पद ठरते. अभिनय क्षेत्र, पत्रकारिता, कॉर्पोरेटस .प्रदीर्घ काळ एकत्र काम करणाऱ्या दोन व्यक्ती आपली सुखदु:खे एकमेकांशीवाटून घेणे यात नवल काहीच नाही. वोल्ट. कॉम या करिअर वेबसाईटने या विषयी सर्वेकेला असता असे दिसून आले की हे नाते भावनिकदृष्ट्या जास्त दृढ आणि मजबूत असते.विशेषत: स्त्री आणि पुरुषामध्ये असलेले. या नात्यात शारीरिक आकर्षणापेक्षा भावनिक बंधजास्त असतात. कार्यालयातील समस्या, व्यक्तिगत समस्या एकमेकांशी बोलून दाखविणे,एकमेकांची मदत करणे ई. पण वोल्ट.कॉमच्या समाजशास्त्रीय सर्वेक्षणानुसार ही जोडपीएकमेकांच्या वास्तविक परिस्थितीचा सन्मान करतात. आणि गरज पडल्यास कोणताहीराग, द्वेष, बाचाबाची न करता अतिशय सहजतेने एकमेकांत अंतरही राखतात.या नात्याचा फायदा काय हा प्रश्न आहे. सर्वेक्षणानुसार यामुळे काम सोपे आणिआनंददायी वाटू लागते. अनेक कॉर्पोरेट संस्था आपली कार्यालयात स्त्री पुरुषांचे प्रमाणसारखे किंवा समान ठेवतात. मानसशास्त्रज्ञांच्या मते जेव्हा स्त्री आणि पुरुष एकत्र कामकरतात तेव्हा काही कारण नसताना त्यांच्यात १०% आनंदी भावना असते. मग भलेही याआनंदाला काहीही अर्थ नसेल. वास्तविक दोन भिन्न लिंगी व्यक्ती एकत्रित काम करतअसताना नकळत एकमेकांना सकारात्मक उर्जा देत असतात. यातून कामाची गुणवत्ता वाढते.