छात्रभारतीच्या राज्य अध्यक्षपदी रोहित ढाले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत रोहित ढाले यांची राज्य अध्यक्षपदी बहुमताने निवड करण्यात आली. छात्र भारती संघटनेच्या राज्य कार्याध्यक्षपदी समाधान बागुल आणि कार्यवाहपदी अनिकेत घुले यांची निवड यावेळी करण्यात आली.

रोहित हे मागील 7 वर्षांपासून छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून राज्यभर विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कासाठी लढत आहेत. या आधी ते छात्रभारतीचे मुंबई अध्यक्ष व राज्याचे कार्याध्यक्षही राहिले आहेत. रोहित यांच्या निवडीनंतर राज्यभर संघटनेचे काम अधिक जोमाने सुरू राहील, अशी अपेक्षा विद्यार्थी नेते आणि छात्रभारतीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.