मुंबईत कोरोनाचे 290 रुग्ण 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत गुरुवारी दिवसभरात कोरोनाचे 290 रुग्ण सापडले तर दोघांचा मृत्यू झाला. रुग्णांपैकी 271 जणांना कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसली नाहीत. मात्र 19 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले तर 5 जणांना ऑक्सिजन बेड देण्यात आले. दिवसभरात 270 जण कोरोनामुक्त झाले तर सक्रिय रुग्णांची संख्या 2 हजार 236 वर पोहोचली आहे. दरम्यान, राज्यात दिवसभरात 1 हजार 76 कोरोना रुग्ण सापडले तर 6 जणांचा मृत्यू झाला. 1 हजार 31 जण कोरोनामुक्त झाले तर 7 हजार 82 सक्रिय रुग्ण आहेत.