गणरायाला आज निरोप, पुढच्या वर्षी लवकर या!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना संकटानंतर तब्बल दोन वर्षांनी यंदा राज्यभरात गणेशोत्सव दणक्यात साजरा करण्यात आला. मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यभरात उत्सवाचे आणि उत्साहाचे चैतन्य निर्माण करणारा श्री गणराय उद्या शुक्रवारी भक्तांघरचा निरोप घेणार आहे. गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी चौपाटय़ा, विसर्जन घाट, कृत्रिम तलाव या ठिकाणी जय्यत तयारी करण्यात आली असून पारंपरिक मिरवणुकीने ढोलताशांच्या गजरात भक्तगणांच्या अलोट गर्दीकडून लाडक्या गणपती बाप्पाला ‘पुढच्या वर्षी लवकर या!’च्या निनादात निरोप दिला जाणार आहे.

गणपती विसर्जनासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त

गणपती विसर्जन सोहळा निर्विघ्न पार पाडण्यासाठी मुंबई पोलीस शुक्रवारी शहरात तगडा बंदोबस्त ठेवणार आहेत. स्थानिक पोलीस ठाण्याबरोबरच अतिरिक्त पोलीस फौजफाटादेखील चौपाटय़ा व विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर तैनात असेल.

दोन वर्षांनंतर मोठय़ा धूमधडाक्यात गणपती उत्सव साजरा करण्यात आला. अनंत चतुर्दशीला विसर्जन सोहळादेखील कुठल्याही विघ्नाविना पार पाडण्यासाठी पोलिसांनी पंबर कसली आहे. स्थानिक पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी त्या त्या हद्दीत तैनात राहतील, पण त्याचबरोबर 3200 अधिकारी, 15,500 अंमलदार, एसआरपीएफच्या आठ पंपन्या, एक आरएएफ पंपनी, एक पर्ह्स वनची पंपनी, 750 होमगार्ड, 750 प्रशिक्षित कर्मचारी असा फौजफाटा तैनात असणार आहे. याशिवाय आवश्यक खबरदारी घेण्यात आली असल्याचे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले.