
इंडियन ऑईल कंपनीने चालू आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत ईव्ही चार्जिंग स्टेशनची संख्या 4000पर्यंत वाढवण्याची योजना आखली आहे. सध्या देशभरातील पेट्रोल पंपांवर पंपनीचे 2500 चार्जिंग स्टेशन उपलब्ध आहेत. गुरुवारी जागतिक इलेक्ट्रीक वाहन दिनानिमित्त शुभेच्छा देताना इंडियन ऑईलचे मार्केटिंग संचालक व्ही. सतीश कुमार यांनी या योजनेची माहिती दिली. इलेक्ट्रीक वाहनांना आमचे नेहमीच प्रोत्साहन राहील, असे ते म्हणाले.

























































