साय-फाय – सावधान! बर्फ वितळतो आहे!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रसाद ताम्हनकर

ग्लोबल वार्ंमग’ अर्थात ‘जागतिक तापमान वाढी’चे धोके जगभरात अनुभवायला मिळत आहेत. कुठे पूर्वी कधीही अनुभवायला न मिळालेली उच्चांकी उष्णता तर कुठे प्रचंड पाऊस पडल्याने आलेला महापूर असे धक्कादायक चित्र जगातील वेगवेगळ्या भागात पाहायला मिळत आहे. युरोपात पहिल्यांदाच उष्णतेच्या लाटेने गाठलेला उच्चांक, पाकिस्तानमध्ये आलेला महापूर ह्याच्या ताज्या बातम्या सध्या सतत आपल्यासमोर येत आहेत. यामुळे अनेक देशांसमोर विविध समस्या उभ्या राहात आहेत. त्यातच आता शास्त्र्ाज्ञांनी जागतिक तापमानवाढीच्या दुष्परिणामामुळे ग्रीनलँडमधील बर्फ मोठय़ा प्रमाणावर वितळायला सुरुवात झाली असून, यामुळे आगामी काळात समुद्राच्या पातळीत 1 फुटाची वाढ होण्याचा धोका असल्याचे स्पष्ट केले आहे.

भारत, बांगलादेश, इंडोनेशियासारख्या किनारपट्टीलगतच्या देशांमध्ये त्याचा दुष्परिणाम मोठय़ा प्रमाणावर दिसून येणार आहे. ग्रीनलँडमध्ये इतका बर्फ आहे की जर तो सर्व बर्फ वितळला तर जगभरातील समुद्राच्या पातळीत 25 टक्के वाढ होईल. आता ह्या क्षणी जरी जगभरातील उष्णतेचे उत्सर्जन थांबवण्यात आले, तरीदेखील हा बर्फ वितळणे थांबवता येणे शक्य नसल्याचे शास्त्र्ाज्ञांचे ठाम मत आहे. ह्या नव्या संशोधनाने मानवाच्या चिंतेत अधिक भयावह अशी भर पडलेली आहे. सध्याच्या जागतिक तापमानवाढीच्या गतीचा बर्फ वितळण्यावर काहीही परिणाम होणार नाही. गेल्या शतकात बर्फ वितळण्याचा जो दर होता, तोच यावेळी देखील कायम राहणार आहे. यापूर्वी वितळलेल्या बर्फाचा हा परिणाम असणार आहे.

शास्त्र्ाज्ञांनी ग्रीनलँडबरोबरच डेन्मार्कच्या भूभागाची देखील पाहणी केली आहे. पूर्वी वितळलेल्या बर्फाचा परिणाम होऊन ग्रीनलॅंडचा 3.3 टक्के बर्फ कोणत्याही परिस्थितीमध्ये वितळणारच आहे. ह्या वितळलेल्या बर्फाचे प्रमाण 110 ट्रिलियन टन इतके प्रचंड असणार आहे. तापमान वाढ रोखली गेली, पूर्णपणे थांबवली किंवा हवामानात कितीही चांगला बदल घडला, तरी बर्फाचे हे वितळणे थांबवणे अशक्य असल्याचे शास्त्र्ाज्ञांचे ठाम मत आहे. ह्यासाठी निश्चित किती कालावधी लागेल हे सध्या तरी सांगणे अवघड आहे. उष्ण वाऱयांमुळे हा बर्फ वेगाने वितळत असून, समुद्राचे उबदार पाणीदेखील बर्फ वितळण्याला हातभार लावत आहे.

ह्या धोक्यासंदर्भात जागरुक करणारा अहवाल या वर्षाच्या सुरुवातीला ‘यूएस नॅशनल ओशनिक अँड ऍटमॉस्फेरिक ऍडमिनिस्ट्रेशन’ने प्रसिद्ध केला होता. पुढील 30 वर्षांच्या कालावधीत अमेरिकेच्या किनाऱयावरील पाणी 10 ते 12 इंचांनी वाढण्याचा धोका ह्या अहवालात नमूद करण्यात आला आहे. यामुळे मोठय़ा प्रमाणावर धोकादायक अशा भरतीचा धोका तर उत्पन्न होणार आहे जो नेहमीपेक्षा 10 पट अधिक मोठा असणार आहे. या सर्वाचा एकत्रित परिणाम म्हणजे भूभागात सततच्या वादळांचा धोकादेखील वाढणार आहे.

‘इंटरगव्हर्मेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज’द्वारा अभ्यासासाठी वापरल्या जात असणाऱया मॉडेलनुसार 2100 सालापर्यंत ग्रीनलॅंडच्या वितळत्या बर्फामुळे जवळजवळ 4 इंच (10 सेंटिमीटर) पर्यंत समुद्राच्या पातळीत वाढ होण्याचा अंदाज आहे. जर परिस्थिती आणखी बिघडली तर हा धोका 6 इंच (15 सेंटिमीटर) पर्यंतदेखील पोहोचण्याची भीती आहे.

2020 साली ग्रीनलँडमध्येच 600 टन इतका अजस्त्र्ा बर्फाचा तुकडा तुटून समुद्रात मिसळला होता; ज्यामुळे संपूर्ण जगात समुद्र पातळीत वाढ अनुभवायला मिळाली होती. 600 बिलियन टन म्हणजे किती? तर 544,310,844,000,000 किलोग्रॅम इतका बर्फ. महत्त्वाचे म्हणजे हा एवढा प्रचंड बर्फ उन्हाळ्यात केवळ दोन महिन्यांत वितळला होता. संपूर्ण लॉस एंजलिस शहराला वर्षाला 1 टन पाणी पुरते. यावरून आपल्याला ह्या धोक्याचा अंदाज लावता येईल. ग्रीनलॅंडमध्ये 2002 ते 2018 सालाच्या दरम्यान दरवर्षी सरासरी जेवढा बर्फ वितळला होता त्याच्या दुप्पट 2019 मध्ये वितळला होता. ग्रीनलॅंडच्या जोडीला अंटार्क्टिकातील बर्फदेखील मोठय़ा प्रमाणावर वितळत असल्याने जगभरातील हवामान तज्ञांच्या चिंतेत अधिक भर पडलेली आहे. जर पृथ्वीच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर असलेला बर्फ अशा वेगाने वितळू लागला, तर पृथ्वीच्या चारही बाजूने पाण्याचा स्तर वाढत जाण्याचा धोका आहे.

[email protected]