चंद्रपूर जिल्ह्यात वीज तांडव, दोन ठार; शेतकरी, शेतमजूर महिलेचा समावेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रपूर जिल्ह्यात वीजतांडव सुरू आहे. वीज कोसळल्याने तिघांचा मृत्यू झाला आहे. यात ब्रम्हपूरी तालुक्यातील महिला मजुराचा समावेश आहे तर सावली तालुक्यात शेतकरी तथा शेतमजूर महिलेचाही यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शरद पंढरी मुनघाटे, मंगला सुधाकर येलेट्टीवार अशी मृतकांची नावे आहेत.

सावली तालुक्यातील गेवर्धा खुर्द येथिल शेतकरी शंकर मुनघाटे हे शेतात निंदणाचे काम करीत असताना वीज कोसळली. यात मुनघाटे यांच्या घटनास्थळीच मृत्यू झाला. यावेळी शेतात पाच ते सहा महिला मजूर काम करीत होत्या. त्यातील एक महिला गंभीर जखमी झाली आहे.

घटनेची माहिती पाथरी पोलीस स्टेशनला देण्यात आली. ठाणेदार मोहोड यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. दुसरी घटना सावली तालुक्यातीलच आहे. चकपिरंजी येथील महिला मजूर मंगला सुधाकर येलेट्टीवार या शेतात निंदणाचे काम करीत असताना वीज कोसळली. यात त्यांचा मृत्यू झाला. या दोन घटनांनी सावली तालुक्यावर शोककळा पसरली आहे.