
आनंद म्हाप्रळकर
गुंतवणूक म्हणजे अशी काही वस्तू की ज्यामध्ये आपण पैसे गुंतवले की काही काळानंतर ते पैसे वाढून आपल्याला मिळतील. आपल्या सामान्य लोकांना माहीत असलेली अशी एक गुंतवणूक म्हणजे बँक एफडी किंवा पोस्ट सेव्हिंग आणि दुसरे म्हणजे शेअर्स. आता आपण अॅसेट क्लास म्हणजे मालमत्ता वर्गाबद्दल समजून घेऊया…
आज आपण एकंदर गुंतवणुकीची माध्यमं समजून घेऊया… एफडी म्हणजे डेब्ट (debt) अॅसेट क्लास आणि शेअर्स म्हणजे एक्विटी अॅसेट क्लास. पण अजून जर पुढे बघायला गेलो तर या दोघांच्या व्यतिरिक्त सोनं आणि रिअल इस्टेट हे देखील एक अॅसेट क्लास मानले जाते. सोने हे भरपूर वर्षापासून लोक खरेदी करत आले आहेत. आता आपण डेब्ट आणि म्युच्युअल फंडविषयी बोलू. डेब्ट म्हणजे थोडक्यात फिक्स्ड इन्कम प्रॉडक्ट. ज्यामध्ये तुम्हाला ठरलेल्या व्याजदर मिळते आणि तुमची मुद्दल सुरक्षित राहते हे म्हणजे आपल्या समोरच्याला कर्ज देण्यासारखे आहे. त्याला आपण एक रक्कम दिली की ठरलेल्या व्याजदराप्रमाणे परतावे मिळणार मग त्याचा व्यवसाय नफा किंवा तोटा काहीही असो.
इक्विटी म्हणजे त्यांच्या व्यवसायामध्ये भागीदारी घेण्यासारखे आहे. म्हणजे जर व्यवसायाने नफा केला तर त्या प्रमाणात तुम्हाला त्याचा फायदा मिळणार आणि व्यवसायात तोटा झाला तर तुमचेदेखील नुकसान होणार. आता एकीकडे हमी आली की तुमची मुद्दल सुखरूप आहे पण परतावा कमी. तुम्ही मुदत ठेवीमध्ये पैसे ठेवले की तुम्हाला साधारण 5.5 टक्के मिळतील पण जर तुम्ही एक्विटीमध्ये इन्व्हेस्ट केले तर ज्या वेगाने तो व्यवसाय चालेल त्याप्रमाणे तुम्हाला परतावा मिळू शकतो. पण तुमची मुद्दल कमी होण्याचा धोका देखील राहतो जर ती पंपनी तोटय़ात असेल तर… या धोक्याच व्यवस्थापन काही प्रमाणात आपण करू शकतो याबद्दल आणि म्युच्युअल फंडबद्दल आपण पुढच्या वेळेला बोलूया…
(लेखक आर्थिक सल्लागार आहेत.)
[email protected]























































