
घाटकोपर ते वर्सोवा धावणाऱया मुंबई मेट्रो वनच्या एअरपोर्ट रोड स्थानकावर तांत्रिक बिघाड झाल्याने बुधवारी रात्री प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागला. त्यामुळे घाटकोपर ते एअरपोर्ट स्थानक या दरम्यान सेवा मर्यादित करावी लागली.
ऐन पावसाच्या वेळी हा बिघाड झाल्याने घाटकोपर स्थानकात प्रवाशांच्या मोठय़ा रांगा लागल्या. रात्री सवानऊच्या सुमारास एअरपोर्ट रोड स्थानकावर मेट्रो वनच्या गाडीचे दरवाजे बंद न झाल्याने गाडी अडकुन पडली. त्यामुळे घाटकोपर ते एअरपोर्ट रोड स्थानक या दरम्यान सेवा मर्यादित करावी लागली. संपूर्ण घाटकोपर ते वर्सोवा मार्गावर सेवा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू होते.



























































