पतंजलीचं तूप ऑस्ट्रेलियात ‘पास’ मग हिंदुस्थानात ‘नापास’ का? बाबा रामदेव यांचा प्रश्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पतंजली फूडसचा आयपीओ बाजारात आणल्यानंतर बाबा रामदेव यांनी त्यांच्या 5 कंपन्यांचे IPO बाजारात आणण्याचे ठरवले आहे. बाबा रामदेव हे पतंजलीच्या अन्य उत्पादनांचे आयपीओ बाजारात आणण्याचा विचार करत असून यामध्ये पतंजली आयुर्वेद, पतंजली वेलनेस पतंजली मेडिसीन, पतंजली लाईफस्टाईल या कंपन्यांचा समावेश आहे. येत्या 5 वर्षात या कंपन्यांचे आयपीओ आणण्याची बाबा रामदेव यांनी तयारी सुरू केली आहे.

बाबा रामदेव यांची पतंजली फूडस ही एकमेव कंपनी सध्याच्या घडीला बाजारात लिस्टेड आहे. पतंजली आयुर्वेदने 2019 साली रुचि सोया ही कंपनी 4350 कोटी रुपयांना विकत घेतली होती. ही कंपनी आधीपासून शेअर बाजारात लिस्टेड होती. या कंपनीचे नाव बदलून पतंजली फूडस करण्यात आले होते. या शेअरने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला असून या कंपनीचे शेअर हे यापुढेही वाढत जातील असे सांगितले जात आहे.

या दरम्यान बाबा रामदेव यांनी अन्नसुरक्षा आणि मानक प्राधिकरणावर एक मोठा आरोप केला आहे. संपूर्ण जगात पतंजलीच्या तुपाची विक्री होते आणि त्याच्या दर्जावर कोणीही प्रश्न विचारत नाही. पण हिंदुस्थानातल्या चाचणीत मात्र नेहमी हे तूप नापास होतं. हे पतंजली विरोधात एक षड्यंत्र रचलं जात आहे, असा सनसनाटी आरोप बाबा रामदेव यांनी केला आहे.

पतंजली फूडसच्या शेअरने 5 वर्षांत 5400% टक्के परतावा दिला आहे. गेल्या दीड महिन्यात या शेअरचे भाव 13 टक्क्यांनी वाढले आहेत. गेल्या 6 महिन्यांचा विचार केल्यास या शेअरच्या दरात 54 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या शेअरचा भाव 2 वर्षांत 105 टक्क्यांनी तर 5 वर्षांत 5400 टक्क्यांनी विधारला आहे. 2017 साली या शेअरची किंमत 26 रुपये होती जी गुरुवारी म्हणजेच 15 सप्टेंबर 2022 रोजी शेअर बाजाराचे कामकाज संपताना 1345 झाली होती.