
चेंबूरमधील मातोश्री रमाबाई उत्कर्ष संघाच्यावतीने थोर समाजसुधारक, विचारवंत पै. केशव सीताराम ठाकरे (प्रबोधनकार ठाकरे) यांची 137 वी जयंती शनिवार, 17 सप्टेंबरला संघाच्या सावित्रीबाई फुले सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. संध्याकाळी 7.30 वाजता हा कार्यक्रम होणार असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगरमध्ये होणाऱया या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बबन कांबळे असून प्रमुख पाहुणे म्हणून माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे, आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते किसन माने, पत्रकार ज्ञानेश महाराव आणि साहित्यिक आनंद म्हस्के आदी उपस्थित राहणार आहेत.






















































