अंबादास दानवेंनी गुलाब पाटलांना केलं लक्ष्य; म्हणाले ‘शिंदे गटात जाऊन…’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भंडाऱ्यात विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी आज पाहणी दौरा केला. अतिवृष्टीमुळे या भागात शेतकऱ्यांचं मोठ्याप्रमाणावर नुकसान झालं आहे. या नुकसानग्रस्त परिस्थितचा दानवेंनी आढावा घेतला. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी गुलाबराव पाटली यांनाही लक्ष्य केलं.

गुलाबराव पाटली यांच्या मतदारसंघातील परिस्थिती अत्यंत भयावह असल्याची टीका यावेळी दानवेंनी केली. फायद्यासाठी स्वत:ला हिंदुत्त्ववादी म्हणणाऱ्या गुलाबराव पाटली यांनी आपले पूर्वजच बदलल्याचा सणसणीत टोला त्यांनी यावेळी लगावला. शिंदे गटात जाऊन एकनाथ शिंदेंनाच आपला आजोबा बनवल्याची टीका अंबादास दानवेंनी केल्याचं वृत्त एका संकेतसस्थाळं दिलं आहे.