
स्वतंत्र विदर्भ राज्य होणे हे शक्य असून या आंदोलनासाठी परिपूर्ण रणनीतीची गरज आहे. कुठलाही राजकीय पक्ष जो सत्तेत असो किंवा विरोधात हा विदर्भ राज्य देणार नाही. विदर्भ राज्य हे सध्या विदर्भ राज्यासाठी कार्यरत असलेल्या विविध पक्ष, संघटना आणि समर्पित विदर्भवादी कार्यकर्त्यांकडूनच होईल, असे आवाहन रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी केले.
विदर्भासाठी पुढील बैठक 1 हजार विदर्भवाद्यांची असावी. त्यानंतरची बैठक प्रत्येक ग्रामपंचायतीतून एक याप्रमाणे 10 हजार लोकांची असेल. यातून 150 लोकांचा वार्ंकग ग्रुप तयार करावा लागेल. ही संस्था सर्वांनी मिळून प्रामाणिकपणे चालवावी. पहिल्या टप्प्यातील योजनेची अंमलबजावणी 6 ते 9 महिन्यांत पूर्ण करावी. जानेवारी 2023 पासून खरे आंदोलन सुरू होईल. जूनपर्यंत पहिले लक्ष्य आत्मसात करायचे आहे. त्यानंतर डिसेंबर 2023 पर्यंत विदर्भाचे संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. 365 दिवस हे आंदोलन होईल.

























































