रामदास कदमांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ जालन्यात संतप्त शिवसैनिकांचे जोडे मारो आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रामदास कदम यांनी केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ जालना जिल्ह्यातील भोकरदनमध्ये संतप्त शिवसैनिकांनी कदम यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारून शहरातील महात्मा फुले चौकात प्रतिमेचे दहन केले. त्यांच्या विरोधात घोषणा बाजी करत निषेध आंदोलन करून त्यांना यापुढे महाराष्ट्रात कुठे फिरू देणार नाही असा इशाराही यावेळी शिवसैनिकांनी दिला व प्रशासनाकडे लेखी स्वरूपात निषेधही नोंदविला.

दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्याचे निवासस्थान असलेले मातोश्री यावर टिका करणाऱ्या रामदास कदमांना यापुढे असे अपशब्द व चुकीची भाषा वापरल्यास रस्त्यावर फिरू देणार नसल्याचा इशाराही शिवसैनिकांच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी तालुका संघटक महेश पुरोहित, युवासेना उपजिल्हाप्रमुख सुरेश तळेकर, बाळासाहेब करतारे, विठ्ठल पवार, सुरेश कचके, प्रदिप पैठणकर, आत्माराम ठोंबरे, विपीन जोशी, नारायण सोनी, रमेश सोनवणे, अर्जुन ठोंबरे, सुमित पाटील, विजय मोरे, सुरेश पैठणे, मोतीलाल बेरी,गणेश जाधव, सचिन तळेकर, विलास मिरकर, बबलु तडवी यांच्यासह शिवसैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.