चार्जिंग सुरु असताना इलेक्ट्रिक बसमध्ये जोरदार स्फोट, एक जण ठार, दोन जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशातील बरेली येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बरेलीच्या फोर्ट येथे इलेक्ट्रिक बसमध्ये चार्जिंग सुरू असताना मोठा स्फोट झाला. या स्फोटात एकाचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले. जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. इलेक्ट्रिक बसमध्ये स्फोट कशामुळे झाला याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणाची चौकशी केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बरेलीच्या फोर्ट परिसरातील एका चार्जिंग स्टेशनवर एका इलेक्ट्रिक बसमध्ये चार्जिंग सुरु होती. त्याचवेळी बसमध्ये अचानक स्फोट झाला. बसमध्ये झालेल्या स्फोटामुळे घटनास्थळी एकाच गोंधळ उडाला आणि परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले. चार्जिंग स्टेशनवरील कॉम्प्रेसर किंवा तांत्रिक बिघाडामुळे हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.