
घरगुती एलपीजी ग्राहकांना आता सिलिंडरसाठी रेशनिंग प्रक्रियेला सामोर जावे लागणार आहे. नव्या नियमांनुसार एका कनेक्शनवर वर्षभरात फक्त 15 सिलिंडर मिळणार आहेत. यापैकी 12 सिलिंडर हे अनुदानित दराने मिळणार आहेत.
घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्याने सर्वसामान्यांचे बजेट बिघडले आहे. त्यातच आता तेल पंपन्यांनी घरगुती गॅस सिलिंडरचा कोटा निर्धारित केला आहे. ग्राहकाला वर्षभरात 15 सिलिंडर मिळणार असून एका महिन्याला केवळ दोनच गॅस सिलिंडर बुक करता येणार आहेत. यापूर्वी सिलिंडर बुक करण्यासाठी घरगुती ग्राहकांना कुठलीही मर्यादा नव्हती.
घरगुती गॅसचा सिलिंडर हा व्यावसायिक गॅस सिलिंडरपेक्षा स्वस्त असतो. त्यामुळे अनेकदा व्यावसायिक वापरासाठी घरगुती सिलिंडर वापरला जातो. त्यामुळे घरगुती सिलिंडरच्या बुकिंगवर मर्यादा आणल्याचे सांगितले जातेय.
भाजपने थेट नागरिकांच्या मूलभूत हक्कांवरच बंधन घातले
देशवासीयांच्या घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर वापरावर बंधन घालून पेंद्रातील भाजप सरकारने थेट नागरिकांच्या जेवणावर… सण-उत्सव साजरे करण्यावर… आणि एकंदरीत मूलभूत हक्कांवरच बंधन घातले आहे. त्यामुळे या निर्णयाचा एक गृहिणी म्हणून राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जाहीर निषेध केला आहे. सुप्रिया सुळे यांनी ट्विटद्वारे भाजपवर निशाणा साधला. त्या म्हणाल्या, ऐन नवरात्रोत्सवात देशातील महिलांच्या हिताचा निर्णय घेण्याऐवजी मोदी सरकारने गृहिणींच्या चिंतेत आणखी भर घालण्याचे काम केलेय. एकीकडे एलपीजी गॅस सिलिंडर दरात भरमसाट वाढ करायची आणि दुसरीकडे गॅस सिलिंडर वापरावर मर्यादा आणायची. यातून पेंद्र सरकार किती असंवेदनशील आहे हेच दिसून येते.


























































