नवी मुंबईत चार मजली इमारत कोसळली, एकाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवी मुंबई येथील बानकोडे येथे चार मजली इमारत कोसळली असून यात मलब्याखाली दबून एका रहिवाश्याच्या मृत्यू झाला आहे. सुदैवाने इमारती मधील 28 नागरिक इमारत कोसळण्याच्या आधीच बाहेर आल्याने त्यांचे प्राण वाचले. या दुर्घटने मध्ये 8 जण जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.