बोटातली अंगठी गुप्तांगात घातली, वृद्ध कैद्याचे लज्जास्पद कृत्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एका वृद्ध कैद्याने अत्यंत लाजीरवाणे कृत्य केले. त्याच्या या हीन हरकतीमुळे जीव धोक्यात आल्याची घटना उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथे घडली आहे. शक्रवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास कैद्याने त्याच्या बोटातली अंगठी काढून गुप्तांगात घातली.

फिरोजाबाद येथील जिल्हा कारागृहात ही घटना घडली. या कारागृहात मैनपुरी शहीर अली (65) हा कैदी हत्येच्या गुन्ह्याखाली शिक्षा भोगत होता. 31 ऑगस्ट 2013 रोजी इटावा कारागृह प्रशासनाने त्याची फिरोजाबाद जिल्हा कारागृहात बदली केली. तेव्हापासून तो जिल्हा कारागृहातच होता. शुक्रवारी रात्री त्याने त्याच्या बोटातली अंगठी काढून गुप्तांगात घातली. त्यानंतर त्याची प्रकृती ढासळू लागतील. ही बाब कारागृहातील कैद्यांना कळताच त्यांनी याबाबत तुरुंग प्रशासनाला माहिती दिली. त्यानंतर कारागृह पोलिसांनी तात्काळ त्याला शासकीय ट्रॉमा सेंटर येथे दाखल केले. तेथील डॉक्टरांनी या रुग्णाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगून त्याला आग्रा येथील रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला.

या घटनेबाबत जिल्हा कारागृह अधीक्षक अरुणकुमार सिंह यांनी सांगितले की, एका हत्येच्या घटनेप्रकरणी शहीर अली या कैद्याला शिक्षा ठोठावण्यात आली होती. शुक्रवारी रात्री उशिरा त्याने केलेल्या लज्जास्पद कृत्यामुळे त्याची प्रकृती अधिकच बिघडली. इतर कैद्यांकडून मिळालेल्या माहितीनंतर त्याला उपचारासाठी आग्रा येथे पाठवण्यात आले होते, मात्र त्याची प्रकृती उपचारादरम्यान खालावल्यामुळे त्याला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आग्रा येथे पाठवण्यात आले.