
गेल्या काही आठवड्यांपासून बॉलिवूडची हॉट कपल रणवीर सिंह व दीपिका पदुकोण यांच्या घटस्फोटाच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या आहेत. हे दोघे लवकरच अधिकृतरित्या वेगळे होणार असून अशी चर्चा होत असतानाच रणवीर सिंहने एक ट्विट करत या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
The Maison is pleased to welcome the Indian actress, producer and philanthropist @deepikapadukone to the family as its newest ambassador. #Cartier pic.twitter.com/mwjr8qY2Vm
— Cartier (@Cartier) October 3, 2022
दीपिका पदुकोण दागिण्यांच्या एका प्रसिद्ध ब्रँडची अॅम्बेसिडर झाली आहे. त्याची पोस्ट त्या ब्रँडतर्फे ट्विट करण्यात आली होती. ती पोस्ट रणवीर सिंहने शेअर करत त्या सोबत ‘माझी राणी! आम्हाला सर्वांना तिचा अभिमान आहे” (My Queen ! Doing us proud) असे पोस्ट केले आहे. त्याच्या या पोस्टमुळे त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना लगाम लागला आहे.
My Queen ! Doing us proud 🇮🇳🙏🏽 ❤️
— Ranveer Singh (@RanveerOfficial) October 4, 2022
दीपिका व रणवीरमध्ये काहीच आलबेल नसल्याच्या चर्चा गेल्या काही आठवड्यांपासून सुरू होत्या. त्यात ते दोघे वेगळे राहतात असेही बोलले जात होते. त्यामुळे ते घटस्फोट घेणार असल्याचे समोर येत होते. मात्र रणवीरच्या या पोस्टने सर्व चर्चा थांबवल्या आहेत.

























































