
रेशनकार्ड धारकांना दिवाळीच्या निमित्ताने एक किलो रवा, चणाडाळ, साखर व 1 लिटर पामतेल केवळ 100 रुपयांत दिले जाणार आहे. राज्यातील 1 कोटी 70 लाख कुटुंबांना म्हणजेच सुमारे 7 कोटी लोकांना याचा प्रत्यक्ष लाभ होणार आहे. हा संच एक महिन्याच्या कालावधीकरिता देण्यात येऊन त्याचे वितरण ई-पॉस प्रणालीद्धारे करण्याचा निर्णय आज मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला.
राज्य सरकारने जाहीर केलेल्या रेशनकार्ड योजनेसाठी येणाऱया एकूण 486 कोटी 94 लाख खर्चास आज मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
नागपूर मेट्रो रेल प्रकल्पासाठी 9279 कोटी
नागपूर मेट्रो रेल प्रकल्प टप्पा-1 ला गती देण्यासाठी सुधारित 9279 कोटींच्या सुधारित खर्चास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रकल्पाचा मूळ मंजूर खर्च 8680 कोटी इतका असून त्यात 599 कोटी 6 लाख रुपये इतकी वाढ झाली आहे.




























































