गडचिरोलीत दोन नक्षली शरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गडचिरोतील दोन नक्षलवादी पोलिसांना शरण आले. अनिल ऊर्फ रामसे कुजूर (26, रा. गडचिरोली) आणि रोशनी पल्लो (30, रा. छत्तीसगड) अशी या दोघांची नावे आहेत, अशी माहिती गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली. गोयल यांनी सांगितले की, कुजूरवर चार लाख आणि पल्लोवर
दोन लाखांचे बक्षीस होते

कुजूर हे नक्षल सदस्य म्हणून काम करत होता. 2011 मध्ये खोब्रामेंढा आणि ग्यारापट्टी येथे झालेल्या हल्ल्याच्या दोन घटनांमध्ये आणि त्याच वर्षी छोटा झेलिया जंगलात झालेल्या चकमकीत त्याचा सहभाग होता. पल्लोने शरण येण्यापूर्वी डेप्युटी कमांडर आणि नक्षल सदस्य म्हणून काम केले होते. ती विविध चकमकी आणि हत्यांमध्ये सामील होती.