इलेक्ट्रॉनिक कार घेतायं??? टाटाची ही गाडी ठरू शकते स्वस्तात मस्त, फक्त पहिल्या 10 हजार ग्राहकांना संधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टाटा मोटर्स या देशातील आघाडीच्‍या ऑटोमोबाइल उत्‍पादक कंपनीने आज त्‍यांच्‍या ईव्‍ही समूहामधील नवीन व्हेईकल टियागो ईव्‍हीच्‍या बुकिंगच्‍या शुभारंभाची घोषणा केली. ही कार पहिल्‍या 10 हजार ग्राहकांसाठी 8.49 लाख रूपये (संपूर्ण देशात – एक्‍स-शोरूम) या स्‍पेशल सुरूवातीच्‍या किंमतीमध्‍ये लाँच करण्‍यात आली आहे. ज्‍यापैकी 2000 मॉडेल्‍स नेक्‍सॉन ईव्‍ही व टिगोर ईव्‍हीच्‍या सध्या ज्यांच्याकडे टाटाची गाडी आहेत त्यांच्यासाठी आरक्षित असतील.

बुकिंगबाबत माहिती ही पुढील प्रमाणे आहे.

• टियागो ईव्‍हीसाठी बुकिंग्‍जना 10 ऑक्‍टोबरपासून सुरूवात होईल.

• ही कार कोणत्‍याही अधिकृत टाटा मोटर्स डिलरशिपमध्‍ये किंवा www.Tiago.ev.tatamotors.com या वेबसाइटवर 21,000 रूपये बुकिंग रक्‍कम भरत बुक करता येऊ शकते.

• टियागो ईव्‍ही ऑक्‍टोबर 2022 मध्‍ये प्रमुख शहरांमधील आघाडीच्‍या मॉल्‍समध्‍ये प्रदर्शनार्थ ठेवण्‍यात येईल.

• ग्राहकांसाठी टेस्‍ट ड्राइव्‍ह्स डिसेंबर 2022 च्‍या शेवटच्‍या टप्‍प्‍यापासून उपलब्‍ध असतील.

• टियागो ईव्‍हीच्‍या डिलिव्‍हरींना जानेवारी 2023 पासून सुरुवात होईल.

• वेळ, तारीख, तसेच निवडण्‍यात आलेला व्‍हेरिएण्‍ट व रंगानुसार व्हेईकलची डिलिव्‍हरी तारीख ठरवण्‍यात येईल.

• डिलिव्‍हरीच्‍या वेळी ग्राहकांच्‍या अपेक्षांची पूर्तता करण्‍यासाठी ग्राहक अभिप्रायांनुसार 24 केडब्‍ल्‍यूएच बॅटरी पॅक व्‍हेरिएण्‍ट्सच्‍या उत्‍पादनाला प्राधान्‍य देण्‍यात आले आहे.

बुकिंग्‍जच्‍या शुभारंभाबाबत बोलताना टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लि.च्‍या विपणन, विक्री व सेवा धोरणाचे प्रमुख विवेक श्रीवत्‍स म्‍हणाले, ‘तसेच आमच्‍या ईव्‍ही अधिक प्रमाणात उपलब्‍ध करून देण्‍याच्‍या विचारासह व या लाँचसह आम्‍ही 80 नवीन शहरांमध्‍ये प्रवेश करत आहोत, ज्‍यामुळे आमचे नेटवर्क 165 हून अधिक शहरांपर्यंत विस्‍तारित होत आहे. यंदाच्‍या सणासुदीच्‍या काळात हा ग्राहकांसाठी उत्‍साहवर्धक नवीन पर्याय आहे.’

ईव्‍हीला चार्ज करण्‍यासाठी 4 विभिन्‍न चार्जिंग सोल्‍यूशन्‍स देत आहे –

• कुठेही, कधीही विनासायास चार्जिंगसाठी 15 अॅम्पियर प्‍लग पॉइण्‍ट

• प्रमाणित 3.3 केडब्‍ल्‍यू एसी चार्जर

• 7.2 केडब्‍ल्‍यू एसी होम फास्‍ट चार्जर, जो फक्‍त 30 मिनिटांच्‍या चार्जिंगमध्‍ये 35 किमी अंतरापर्यंत प्रवासाची खात्री देऊ शकतो. तसेच 3 तास 36 मिनिटांमध्‍ये वेईकलची संपूर्ण चार्जिंग (10 टक्‍क्‍यांपासून 100 टक्‍क्‍यांपर्यंत) होऊ शकते.

• डीसी फास्‍ट चार्जिंग, जे फक्‍त 30 मिनिटांच्‍या चार्जिंगमध्‍ये 110 किंमी अंतरापर्यंत प्रवासाची खात्री देऊ शकते आणि फक्‍त 57 मिनिटांमध्‍ये व्हेईकलला 10 टक्‍के ते 80 टक्‍क्‍यांपर्यंत चार्ज करू शकते.