मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्र परीक्षेच्या सुधारित तारखा जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष 2022 चे द्वितीय सत्र म्हणजे हिवाळी सत्र परीक्षेच्या सुधारित तारखा जाहीर केल्या आहेत. या परीक्षा 4 नोव्हेंबरपासून सुरू होत आहेत. यातील तृतीय वर्ष बीए व बीएस्सी सत्र 5 च्या परीक्षा 4 नोव्हेंबर तर तृतीय वर्ष बीकॉम सत्र 5 ची परीक्षा 18 नोव्हेंबरपासून सुरू होत आहेत. हिवाळी सत्राच्या सर्व विद्याशाखेच्या नियमित व बॅकलॉगच्या सर्व परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहेत.

379 परीक्षेच्या तारखा जाहीर

विद्यापीठ दरवर्षी चार विद्याशाखेच्या 450 पेक्षा जास्त परीक्षा घेत असते. विद्यापीठाने 2022 च्या हिवाळी सत्राच्या मानव्यविद्याशाखेच्या एकूण 80 परीक्षा, वाणिज्य विद्याशाखेच्या 96 परीक्षा, विज्ञान विद्याशाखेच्या 94 परीक्षा तर आंतर विद्याशाखेच्या 109 अशा 379 परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. तंत्रज्ञान विद्याशाखेच्या व दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या परीक्षेच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील. सर्व विद्याशाखेच्या सर्व परीक्षेच्या तारखेचे परिपत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या परीक्षांचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल.

परीक्षा मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार 2022 च्या हिवाळी सत्रापासून सर्व विद्याशाखेच्या नियमित व बॅकलॉगच्या परीक्षा ऑफलाइन म्हणजेच पूर्वीच्या पारंपरिक पद्धतीने घेण्यात येणार आहेत. – डॉ. प्रसाद कारंडे प्रभारी संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ

परीक्षेच्या तारखा

n बीए सत्र 5 – 4 नोव्हेंबर 2022 n बीएस्सी सत्र 5 – 4 नोव्हेंबर 2022 n बीए मल्टिमीडिया अँड मासकम्युनिकेशन सत्र 5 – 4 नोव्हेंबर 2022 n बीकॉम सत्र 5 – 18 नोव्हेंबर 2022 n बीएस्सी आयटी सत्र 5 , बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स सत्र 5 – 3 नोव्हेंबर 2022 n बीएमएस सत्र 5, बीकॉम अकाऊंट अँड फिनान्स सत्र 5 – 8 डिसेंबर 2022 n बीकॉम फिनान्शिअल मार्केट सत्र 5, बीकॉम बँकिंग अँड इन्शुरन्स सत्र 5, बीकॉम इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट सत्र 5, – बीकॉम फिनान्शिअल मॅनेजमेंट सत्र 5, बीकॉम ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सत्र 5 – 8 डिसेंबर 2022