
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मुंबई विभाग क्र. 10मधील महिला पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळवण्यात आली आहे. त्यानुसार शाखा संघटकपदी माया राऊळ (शाखा क्र. 190), शाखा समन्वयकपदी मानसी बाईत (शाखा क्र. 190) यांच्या नियुक्त्या केल्या आहेत.
वर्धा जिह्यातील पदाधिकारी जाहीर
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने वर्धा जिह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळवण्यात आली आहे. जिल्हा संघटकपदी भारत चौधरी (वर्धा-हिंगणघाट मतदारसंघ), उपजिल्हाप्रमुखपदी बालू ऊर्फ श्रीकांत मिरापूरकर (वर्धा विधानसभा) यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. तालुकाप्रमुखपदी सुभाष कडे (वर्धा तालुका), बाळाभाऊ साटोणे (वर्धा तालुका), सुनील पारसे (सेलू तालुका) यांची तर तालुका संघटकपदी नितीन ढगे (सेलू तालुका) यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

























































