संजय राऊत यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी 21 ऑक्टोबरपर्यंत तहकूब

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी 21 ऑक्टोबरपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. सोमवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आपला युक्तिवाद पूर्ण केला होता. त्यावर मंगळवारी सत्र न्यायालयात संजय राऊत यांचे वकील अॅड. अशोक मुंदरगी यांनी युक्तिवाद केला.

संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर मागील सुनावणीदरम्यान अपूर्ण राहिलेला युक्तिवाद अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी सोमवारी पूर्ण केला. त्यांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत यांचे वकील अशोक मुंदरगी यांनी युक्तिवादासाठी वेळ मागितला. त्यांच्या विनंतीला अनुसरून सत्र न्यायाधीश देशपांडे यांनी त्यांना मंगळवारी सकाळी 11 वाजता युक्तिवाद सुरू करण्यास मुभा दिली होती. त्यानुसार मंगळवारी मुंदरगी यांनी आपला युक्तिवाद केला. त्यानंतर सत्र न्यायालयाने या पुढील सुनावणी 21 ऑक्टोबरपर्यंत तहकूब केली.