अभिनय-तेजस्वीचा ‘मन कस्तुरी रे’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘मन कस्तुरी रे’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच झाला आहे. या सोहळय़ाला अभिनय बेर्डे आणि तेजस्वी प्रकाश यांनी यावेळी स्कूटीवरून धमाकेदार एन्ट्री केली. कॉलेजमध्ये शिक्षण घेत, घरखर्चासाठी नोकरी करून सर्वसामान्य आयुष्य जगणाऱया सिद्धांतच्या आयुष्यात श्रुती येते आणि त्याचे पूर्ण आयुष्यच बदलते. श्रुती आणि सिद्धांत एकमेकांवर जिवापाड प्रेम करतात, पण त्या दोघांच्या प्रेमाला नजर लागते. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये भरपूर सस्पेन्स आणि ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. त्यांचे प्रेम एवढय़ा टोकाला का पोहोचते, हे आपल्याला चित्रपट पाहिल्यावरच कळेल. संकेत माने दिग्दर्शित हा चित्रपट 4 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.