सावधान ! सोशल मीडीयावर डेटींग करणाऱ्यांसाठी ही बातमी, वाचा सविस्तर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जर तुम्ही ऑनलाईन डेटींग करत असाल तर सावधान राहा. एक नवा घोटाळा समोर आला आहे. ज्यामध्ये पुरुष वर्गाला लक्ष्य करुन सेक्सटॉर्शनचा शिकार केलं जात आहे. सगळ्यात आधी तुमच्याशी मैत्री केली जाईल. त्यानंतर व्हिडीओ कॉल स्विकारल्यानंतर समोरची व्यक्ती कपडे काढायला लागते आणि त्याची रिअॅक्शन रेकॉर्ड केली जाते. त्यानंतर त्या व्हिडीओचा वापर करुन ब्लॅकमेल करत बळजबरीने वसुली करण्यात येत आहे. त्यामुळे अनोळखी व्यक्तींना डेट करताना सांभाळून राहा.

इंटरनेटवर रिपोर्ट केलेल्या अनेक घटना समोर आल्या आहेत. विशेष म्हणजे हे गुन्हेगार पुरुष वर्गाला लक्ष करत आहेत आणि स्ट्रिपिंग दाखविण्यासाठी महिलेचा वापर करतात. आधी मैत्री करुन  व्हिडीओ कॉल उचलल्यानंतर एक महिला कपडे उतरवताना दिसते आणि त्याचवेळी पुरुषाची रिअॅक्शन रेकॉर्ड केली जाते आणि पिडीताला व्हिडीओ सार्वजनिक करण्याची धमकी दिली जाते.

या घोटाळ्या संदर्भात देशातील विविध भागातील पिडीतांनी दावा केला आहे. उदाहरणार्थ, नुकतीच एक घटना घडली. बंगळुरुच्या एका 24 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनीअर असललेला तरुण या घोटाळ्यात फसला होता. डेटिंग अॅपवर होतायत्याने त्याने एका महिलेला ईमेल केला आणि त्नतर  दोघांनी एकमेकांसोबत बोलणे सुरु केले. त्यांच्यात चांगली ओळख झाल्यानंतर दोघांनी एकमेकांना आपले नंबर दिले. द न्यूज मिनीटला दिलेल्या माहितीत,  सॉफ्टवेअर इंजिनीअरने सांगितले की, नंबर एकमेकांना दिल्यानंतर एका दिवसानंतर मला एक व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉल आला, त्याने तो रिसिव्ह केला आणि काही कळायच्या आत एक महिला कपडे उतरवायला लागली. मी तो कॉल कट केला. मात्र त्यांच्यासाठी तेवढेपुरेसे होते. मात्र त्यांनी ते एडिट करुन असे भासवले की तो बराचवेळ व्हिडीओ कॉलवर होता. त्यानंतर त्याला व्हिडीओची धमकी देणारा फोन आल आणि त्याच्याकडे 2 हजार रुपयांसाठी ब्लॅकमेल करायला लागला. समोरुन त्याला सारखे सारखे धमकावण्याचा फोन आला. त्याने तो नंबर ब्लॉक केला.

देशभरातून अशी अनेक प्रकरणं समोर आली आहेत. खरंतर, घोटाळेबाज पकडले जाऊ नये यासाठी देशभरातील वेगवेगळ्या भागातील लोकांना फोन केला जातो. त्यानंतर फोन नंबर घेत व्हिडीओ कॉल करुन त्याला पैशांसाठी धमकावले जाते. मात्र व्हिडीओ व्हायरल करण्याच्या भितीने काही लोकं पैसे देतात. या घटनांमुळे काहीजण आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतानाही पाहिले असेल.

या सगळ्यात  कुठल्याही अनोळखी नंबरवरुन व्हिडीओ कॉल उचलू नये. जर तुम्ही डेटिंग अॅपवर आहात आणि दुसरा व्यक्ती व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून बोलू इच्छित असेल तर तो फोन उतलण्यापूर्वी त्या व्यक्तीची शहानिशा करा. जरी अशाप्रकराला बळी पडलात तरी त्यांना पैसे न देता सायबर पोलिसांची मदत घ्यावी,.