
जम्मू-कश्मीर पोलिसांनी रविवारी एका दहशतवादी मॉड्यूलचा भांडाफोड केल्याचा दावा केला आहे. हे मॉड्यूल युरोपमधून चालवले जात होते. जम्मूमध्ये ड्रोनच्या सहाय्याने पाकिस्तानातून शस्त्रे आणि स्फोटकं सोडण्यात सहभागी असलेल्या दोन जणांना पोलिसांनी अटक केली. डोडा येथील चंदर बोस आणि कॅम्प गोले गुजराल, जम्मू येथील समशेर सिंग यांना आरएस पुरा येथील आंतरराष्ट्रीय सीमेवर (IB) बसपूर बांग्ला भागात ड्रोन सोडल्याच्या तपासादरम्यान पकडण्यात आले. त्यांच्याकडून चार पिस्तूल, आठ मॅगझिन आणि 47 काडतूसे जप्त करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अतिरिक्त पोलीस महासंचालक (एडीजीपी) मुकेश सिंग म्हणाले की, चौकशीदरम्यान बोसने खुलासा केला की तो सिंगच्या इशाऱ्यावर काम करत होता. अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोघांच्या चौकशीदरम्यान दहशतवादी मॉड्यूलचा ऑपरेटर युरोपमध्ये असल्याचे आढळून आले. सिंग म्हणाले, ‘दोघेही (बोस आणि सिंग) बलविंदर नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात होते, जो जम्मूचा रहिवासी आहे आणि आता युरोपमध्ये स्थायिक झाला आहे’, असे सिंग म्हणाले.
अटक करण्यात आलेले आरोपी आणि OGW हे प्रतिबंधित दहशतवादी संघटनेसाठी काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. ‘बलविंदर हा देशातील आरोपी आणि पाकिस्तानमधील शस्त्रास्त्रे पाठवणार्या दोघांशी समन्वय साधत होता’, तो म्हणाला.




























































