माहीम विधानसभेतील युवासेना विभाग युवा अधिकारी पदाकरिता मुलाखती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माहीम विधानसभेतील युवासेनेच्या विभाग युवा अधिकारी पदाकरिता नेमणूक करण्यात येत असून सदर पदाकरिता मुलाखती घेण्यात येणार आहेत. या मुलाखती शनिवार, 5 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता शिवसेना भवन, दादर येथे होतील.

युवासेनेचा पदाधिकारी होण्यास इच्छुक असणाऱयांनी युवासेनेचा सक्रिय सदस्य असणे गरजेचे आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीपूर्वी एक तास अगोदर उपस्थित राहावे. तसेच येताना आपले छायाचित्र सोबत आणावे. इच्छुक कार्यकर्त्यांसाठी माहिती अर्ज सदर मुलाखती ठिकाणी ठेवण्यात येतील, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.