
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवार, 4 नोव्हेंबरला संध्याकाळी 7 वाजता वरळी सी फेसवरील स्व. बिंदुमाधव ठाकरे चौकात वरळी कोळी खाद्य महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी त्यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कारही केला जाणार आहे. महोत्सवात विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल असणार असून खवय्यांसाठी मोठी मेजवानी ठरणार आहे. शनिवार, 5 नोव्हेंबरला नाखवा माझा, दर्याचा राजा हा कोळी गीतांचा कार्यक्रम तर रविवार, 6 नोव्हेंबरला खेळ खेळीला दर्यावरी हा कोळी नृत्याचा कार्यक्रम होणार आहे. वरळी युवासेना उपविभाग अधिकारी अभिजित पाटील आणि वरळी सागरी कोळी महोत्सव समितीच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.




























































