
वॉट्सअॅपच्या युजर्ससाठी आनंदाची बातमी आहे. आता वॉट्सअॅपवर एकाचवेळी 32 जणांना व्हिडीओ कॉल करता येणार आहे. व्हॉट्सअॅपच्या नव्या फिचरमुळे समान रुची असलेल्या लोकांना एकत्र आणता येणार आहे.
काही दिवसांपूर्वी मेटाचे मार्क झुगरबर्ग यांनी व्हॉट्सअॅप कम्युनिटी या फिचरवर काम करत असल्याची घोषणा केली होती. कम्युनिटी या नव्या फिचरच्या माध्यमातून एकाच वेळी अनेकांशी कनेक्ट होता येणार आहे. त्यामुळे ग्रुप डिस्कशन, कार्यालयीन कामासाठी या फिचरचा उपयोग होणार आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत 200 सदस्यांची ग्रुप क्षमता होती ती वाढवून 1 हजार 24 करण्यात आली आहे. त्यामुळे आता एकाच ग्रुपमध्ये हजार लोकांशी एकाच वेळी जोडले जाणार आहे. ग्रुप व्हिडीओ कॉलवर एकाच वेळी 32 जणं जोडले जाणार आहेत.
मार्क झुगरबर्ग यांनी बुधवारी या नव्या फिचरची घोषणा केली आहे. कम्युनि़टी ऑन व्हॉट्सअॅप असे या फिचरचे नाव आहे. हे सर्व ग्रुप्स, शाळा, कॉलेज, कामाची ठिकाणं यांना लक्ष्य केलं आहे. आम्ही याबाबत पोल सुरु केला आहे आणि 32 लोकं व्हिडीओ कॉलही करु शकतात. युजर्सना ग्रुपमधूनही मल्टीपल ग्रुप कनेक्ट करता येणार आङेत. सध्या 50 हून अधिक संस्थांसोबत यावर 15 देशांमध्ये काम सुरु केले आहे.



























































