मंदार देवस्थळी आणि पंकज विष्णू 17 वर्षांनी पुन्हा एकत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘अवघाची हा संसार’ मालिकेनंतर तब्बल 17 वर्षांनी दिग्दर्शक मंदार देवस्थळी आणि अभिनेते पंकज विष्णू पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. निमित्त आहे येत्या 7 नोव्हेंबरपासून रात्री 8 वाजता झी मराठीवर सुरू होणाऱया ‘हृदयी प्रीत जागते’ या मालिकेचे. या मालिकेच्या शूटिंगदरम्यान दिग्दर्शक मंदार देवस्थळी आणि अभिनेते पंकज विष्णू यांच्या मैत्रीची आणि एकत्र रंगणाऱया कामाची साक्ष असलेला 17 वर्षांपूर्वीचा एक पह्टो पंकज विष्णू यांनी शेअर केला आहे.

‘हृदयी प्रीत जागते’ मालिकेत दोन तरुणांची कथा आहे, हे दोघेही त्यांच्या स्वभावात आणि जीवनशैलीत वेगळे ध्रुव आहेत, पण संगीत हा त्यांच्यातील एकमेव समान धागा आहे. नायिका कीर्तन गायिका आहे आणि त्यांच्या घरात कीर्तनाची परंपरा आहे. तर नायक रॉक बँड परफॉर्मर आहे. ही भिन्नता असूनसुद्धा दोघांचंही संगीतावर जिवापाड प्रेम आहे. आता हेच संगीत या दोन आत्म्यांना कसं एकत्र आणते हे बघणं प्रेक्षकांसाठी औत्सुक्याचं असणार आहे. राजन भिसे, पौर्णिमा तळवलकर यांच्याही मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.