
पर्यावरण संरक्षणासाठी मुंबई महापालिकेने पुढाकार घेतला असून हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी लाकडाऐवजी शेतमाल आणि झाडांच्या टाकाऊ घटकांपासून बनलेल्या ब्रिकेट्स बायोमासचा पुरवठा करण्यात येणार आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने हा निर्णय घेतला आहे.
मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील हिंदू स्मशानभूमीत मोफत लाकडाचा पुरवठा करण्यात येतो, परंतु पर्यावरणाच्या दृष्टीने झाडांचे संवर्धन आणि संरक्षण करणे गरजेचे आहे. हिंदू स्मशानभूमीत एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी 300 किलो लाकडाची आवश्यकता असते, मात्र ब्रिकेट्स बायोमासचा वापर केल्यास त्याला मृतदेहासाठी 250 किलो ब्रिकेट्स बायोमास लागणार आहे.
प्रत्येक स्मशानभूमीत प्रति मृतदेह दहनासाठी 250 किलोपर्यंत यानुसार एक महिन्याचा सुक्या ब्रिकेट्सचा पुरवठा केला जाणार असून त्यानुसार पंत्राटदाराचे मासिक बिल चुकते केले जाणार आहे. दरम्यान, ब्रिकेट्स बायोमासचा पुरवठा करणाऱया पंत्राटदाराचा पंत्राट कालावधी संपुष्टात आल्याने मे. लाहस ग्रीन इंडिया प्रा. लि. पंपनीला पंत्राट देण्यात आल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
ब्रिकेट्स बायोमासचा पुरवठा 14 स्मशानभूमी
मंगलवाडी (बाणगंगा) स्मशानभूमी (डी)
वैपुंठधाम हिंदू स्मशानभूमी (ई)
गोवारी हिंदू स्मशानभूमी (एफ – उत्तर)
धारावी हिंदू स्मशानभूमी (जी – उत्तर)
खारदांडा हिंदू स्मशानभूमी (एच- पश्चिम)
वर्सोवा हिंदू स्मशानभूमी (के- पश्चिम)
मढ हिंदू स्मशानभूमी (पी – उत्तर)
वडारपाडा हिंदू स्मशानभूमी (आर-दक्षिण)
दहिसर हिंदू स्मशानभूमी (आर-उत्तर)
चुनाभट्टी हिंदू स्मशानभूमी (एल)
चिता पॅम्प हिंदू स्मशानभूमी (एम-पूर्व)
आणिक गाव हिंदू स्मशानभूमी (एम-पश्चिम)
भांडुप गुजराती सेवा मंडळ स्मशानभूमी (एस)
मुलुंड नागरिक सभा हिंदू स्मशानभूमी (टी)






























































