
खराब हवामानामुळे टांझानियातील व्हिक्टोरिया तलावात प्रवासी विमान कोसळल्याची दुर्दैवी घटना रविवारी घडली. हे विमान 43 जणांचा घेऊन जात होते. त्यापैकी 19 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती टांझानियाचे पंतप्रधान कास्सिम मजलिवा यांनी दिली. या दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
माहितीनुसार, टांझानियाची राजधानी दार एस सलाम येथून हे विमान कागेरा येथे जात होते. यावेळी या विमानात 39 प्रवासी, 2 पायलट आणि 3 केबिन क्रू असे एकूण 43 जण प्रवास करत होते. खराब हवामानामुळे हे विमान बुकोबा विमानतळावर उतरत होते. दरम्यान, विमानतळापासून अवघ्या 100 मीटर अंतरावर हा अपघात घडला आहे. सदर घटनेची माहिती मिळातच पोलीस दल आणि बचाव दलाची पथके घटनास्थळी दाखल झाली. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.




























































