
फेसबुकची पैतृक कंपनी मेटाची या आठवड्यात हजारो कर्मचार्यांना काढून टाकण्याची योजना असल्याचं सांगितलं जात आहे. कर्मचार्यांची संख्या कमी करण्यासाठी पाऊल उचलणारी ही आणखी एक नवीन टेक कंपनी असेल, असा रिपोर्ट अमेरिकेतील मीडियानं 6 नोव्हेंबर रोजी नोंदवला आहे.
वॉल स्ट्रीट जर्नलने, या प्रकरणाशी संबंधित लोकांचा हवाला देत रिपोर्ट दिला आहे की यामुळे मेटातील कर्मचार्यांच्या संख्येवर परिणाम होऊ शकतो आणि 9 नोव्हेंबरला लवकरच घोषणा अपेक्षित होती.





























































