गोखले पूल बंद झाल्यामुळे मेट्रोचे प्रवासी वाढले, आणखी गर्दी वाढल्यास जादा फेऱ्या चालविणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम रेल्वेच्या अंधेरी स्थानकाजवळील गोखले पुल सोमवारपासून दोन वर्षे वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्यामुळे अंधेरी पूर्व आणि पश्चिमेचा संपर्क तुटणार आहे. घाटकोपर ते वर्सोवा धावणाऱ्या मुंबई मेट्रो वनने गर्दी वाढण्याचा अंदाज घेत एक ट्रेन राखीव ठेवली आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत मुंबई मेट्रो वनच्या 11 हजार प्रवाशांची वाढ झाली आहे.

मुंबई मेट्रो वनच्या आझादनगर मेट्रो स्थानकाच्या प्रवासी संख्येत 26 वाढ झाल्याचे मुंबई मेट्रो वनने म्हटले आहे. अंधेरीच्या पश्चिम बाजूकडील वर्सोवा, डी.एन.नगर आणि आझाद नगर स्थानकातील प्रवासी संख्या 17 टक्के वाढली आहे. गेल्या आठवड्यातील सोमवारच्या प्रवासी संख्येच्या तुलनेत आजच्या सोमवारी 11 हजारांची वाढ नोंद झाली आहे. मुंबई मेट्रो वनने सध्या दररोज 3 लाख 84 हजार प्रवाशांची वाहतूक केली जात आहे.