मिचेल कुटुंबाचा धाडसी प्रवास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बालदिनी ‘द मिचेल्स व्हर्सेस द मशीन्स’ चित्रपटाचे हिंदी व्हर्जन प्रेक्षकांना एका धाडसी प्रवासावर घेऊन जाणार आहे.

‘द मिचेल्स व्हर्सेस द मशीन्स’  चित्रपटात केटी मिचेल या लहान गोड मुलीची कथा सादर करण्यात आली आहे. केटी आपला आवडता श्वान, धाकटा भाऊ आणि आई-वडिलांबरोबर एका रोड ट्रिपवर जाते. सर्व कुटुंबीयांनी एकत्र येऊन धमाल करण्याच्या त्यांच्या या योजनेवर मात्र पाणी पडते. कारण जगातील सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे एकाएकी ‘जिवंत’ होतात आणि जगाचा ताबा घेण्याचा प्रयत्न करतात. मग पुढे काय होतं? यंत्रांच्या नियंत्रणातून जगाची सुटका करण्यात मिचेल कुटुंबीय यशस्वी होतात का? 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता ‘अॅण्ड पिक्चर्स  वाहिनी’वर या ऑनिमेटेड कॉमेडी चित्रपटाचा प्रीमियर बघता येईल.