मोरोक्को 36 वर्षांनंतर बाद फेरीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोरोक्कोने कॅनडावर 2-1 गोल फरकाने विजय मिळवत तब्बल 36 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर फिफा वर्ल्ड कपच्या बाद फेरीत धडक दिली. मोरोक्कोने याआधी 1986मध्ये विश्वचषक फुटबॉल स्पर्धेची बाद फेरी गाठली होती. मोरोक्को-कॅनडा लढतीत पूर्वार्धातच तीन गोल झाले. हाकीम जिएचने चौथ्याच मिनिटाला गोल करीत मोरोक्कोचे खाते उघडले. त्यानंतर युसूफ एन-नेसरीने 23व्या मिनिटाला गोल करीत मोरोक्कोची आघाडी 2-0 अशी वाढविली.