
वंचित बहुजन आघाडीचे नेते व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील 2019च्या निवडणुकीतील उमेदवार हाजी अस्लम सय्यद यांनी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी हाजी अस्लम सय्यद यांच्या हातावर शिवबंधन बांधत त्यांचे पक्षात स्वागत केले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कुशल नेतृत्वावर विश्वास ठेवून देशातील हजारो मुस्लीम कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत व शिवसेनेच्या भूमिकेला पाठिंबा देत आहेत. तोच धागा पकडून आपण आज शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे हाजी अस्लम सय्यद यांनी नमूद केले. त्यांच्यासह त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनीही शिवसेनेचा भगवा हाती घेतला.
या वेळी शिवसेना सचिव, खासदार विनायक राऊत, उपनेते आणि संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, आसीफ सौदागर, संतोष शिंदे, मोहसीन मुल्लाने, फिरोझ महात, यासीन पठाण, साकीद पठाण आदी उपस्थित होते.
वंचित बहुजन आघाडीचे नेते हाजी अस्लम सय्यद यांनी मंगळवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.

























































