
फिफा वर्ल्ड कपच्या मुख्य स्पर्धेत हिंदुस्थानी संघ खेळत नसला तरी कतारमध्ये जागोजागी हिंदुस्थानचे अस्तित्व जाणवत आहे. स्पर्धेच्या उद्घाटनाला नोरा फतेहीने आपल्या नृत्याचा जलवा दाखवला होता, तर हिंदुस्थानी सिनेतारका दीपिका पदुकोनला फिफा वर्ल्ड कपच्या ट्रॉफीचे अनावरण करण्याचे आमंत्रण देण्यात आले आहे. येत्या 18 डिसेंबरला अंतिम सामन्यापूर्वी दीपिकाला हे भाग्य लाभणार आहे. याबाबत आयोजकांकडून लवकरच अधिकृत घोषणा केली जाईल. सध्या ती आपल्या फायटर सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त असून ती लवकरच कतारला रवाना होणार आहे.

























































