
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्याच्या मोपातील नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आज उद्धाटन केले. गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे नाव या विमानतळाला देण्यात आले आहे. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2016 मध्ये विमानतळाचे भूमिपूजन करण्यात आले होते.
मोपातील नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी 2 हजार 870 कोटी रुपयांचा खर्च आला असून दरवर्षी या विमानळावर 40 लाख प्रवासी ये-जा करतील. दर वर्षी त्यात 3 कोटी प्रवाशांची भर पडण्याची शक्यता आहे.
दाभोळीनंतर गोव्यातील हा दुसरा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. दाभोळीवरून दरदिवशी 15 देशांतर्गत आणि 6 आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणे होतात. मोपा विमानतळाची क्षमता जास्त असून दरदिवशी 35 देशांतर्गत आणि 18 आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणे होणार आहेत.


























































