
राज्य निमंत्रित खो-खो स्पर्धेत पुरुष गटात नवमहाराष्ट्र संघ पुणे विरुद्ध महात्मा गांधी स्पोर्ट्स अकादमी मुंबई उपनगर तर महिला गटात रा. फ. नाईक खो-खो संघ (ठाणे) विरुद्ध छत्रपती व्यायाम प्रसारक मंडळ (धाराशीव) असे अंतिम सामने होतील.
मोहोळ येथे सुरू असलेल्या पुरुष गटातील उपांत्य सामन्यात पुण्याच्या नवमहाराष्ट्र संघाने विहंग क्रीडा मंडळ, ठाणे संघास 11-10 असे 2.40 मि. राखून नमविले. दुसऱया उपांत्य सामन्यात राणाप्रताप तरुण मंडळ कुपवाड (सांगली) संघावर 13-12 अशी 1 गुण व 30 सेपंद राखून अशी मात करताना शिर्सेकर महात्मा गांधी स्पोर्ट्स अकादमी, मुंबई उपनगरची चांगलीच दमछाक झाली. महिला गटातील उपांत्य सामन्यात धाराशीवच्या छत्रपती व्यायाम प्रसारक मंडळाने नाशिकच्या संस्कृती क्लबवर 6-5 असा 6.10 मिनिटे राखून दणदणीत विजय मिळवला.



























































