सुलोचना चव्हाण यांना आदरांजली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्येष्ठ गायिका सुलोचना चव्हाण यांची लावणी घरंदाज आणि ऐश्वर्यवान होती. त्यांनी फडावरची लावणी माजघरात पोहोचवली, अशी भावना लोककलेचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा. डॉ. प्रकाश खांडगे यांनी व्यक्त केली. मुंबई विद्यापीठाची लोककला अकादमी, शाहीर अमर शेख अध्यासन, अॅपॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स आणि संगीत विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सुलोचना चव्हाण यांच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील  महिला शाहिरा केशर जैनू चांद यांनाही श्रद्धांजली वाहण्यात आली.