IPL Auction 2023 आयपीएलच्या संघात परदेशी खेळाडूंनाच ‘किंमत’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयपीएलच्या मिनी लिलावातही हिंदुस्थानी खेळाडूंच्या तुलेत परदेशी खेळाडूंनाच किंमत मिळाली आहे. आयपीएलच्या दहाही संघांचा विचार केला तर पाच संघांमध्ये सर्वाधिक किंमत परदेशी खेळाडूंनाच मिळाल्या आहेत. यावरून स्पष्ट दिसते की आयपीएलचे संघ हिंदुस्थानी खेळाडूंपेक्षा परदेशी खेळाडूंनाच मोठय़ा किमतींसाठी पसंती देत आहेत.

आयपीएलच्या संघात सर्वाधिक किंमत मिळविणारा के. एल. राहुल ठरला आहे. लखनौने त्याला संघात कायम ठेवताना 17 कोटी रुपये मोजलेत, तर बंगळुरूने विराट कोहलीसाठी आणि गुजरातने हार्दिक पांडय़ासाठी 15 कोटी रुपये दिलेत. दिल्लीतून ऋषभ पंत 16 कोटींसह सर्वात महागडा खेळाडू आहे तर राजस्थान रॉयल्सने संजू सॅमसनसाठी 14 कोटी रुपये मोजेलेत. हे पाच संघ वगळता अन्य पाच संघांमध्ये सॅम करन (पंजाब), आंद्रे रसेल (कोलकाता), बेन स्टोक्स (चेन्नई), पॅमेरून ग्रीन (मुंबई), हॅरी ब्रुक (हैदराबाद) हे सर्वात महागडे खेळाडू ठरले आहेत. एवढेच नव्हे तर हिंदुस्थानी खेळाडूंपेक्षा जास्तीत जास्त परदेशी खेळाडूंनाच दहा कोटींपेक्षा अधिक  किंमत संघ मालकांनी मोजली आहे.

20 लाखांच्या मुकेश कुमारला साडेपाच कोटींची बोली

मूळ किंमत 20 लाख रुपये असलेल्या मुकेशला दिल्लीने चक्क 27 पट अधिक रक्कम मोजत 5.5 कोटींच्या बोलीवर आपल्या संघात घेतले. अखेर आज त्याला आयपीएलची लॉटरी लागली. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमुळे त्याचे वडील कोलकात्यात जाऊन रिक्षा चालवत असत, तर मुकेश बिहारच्या गोपालगंज भागात क्रिकेट खेळत होता. त्याने आपल्या दमदार खेळाच्या जोरावर 19 वर्षांखालील बिहारच्या संघात स्थान मिळविले. नंतर त्याच्या वडिलांनी मुकेशला नोकरीसाठी कोलकात्याला बोलावले. मग त्याने कोलकात्यात आपले क्रिकेट सुरू ठेवले आणि तो बंगालकडून खेळू लागला. मध्यमगती गोलंदाज असलेल्या मुकेशने 33 प्रथम श्रेणी सामन्यांत 123 विकेट घेतल्या असून टी-20 क्रिकेटमध्येही तो चमकदार कामगिरी करतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा फारसा अनुभव नसलेल्या मुकेश कुमारसाठी आयपीएल ही एक लॉटरीच आहे.

विवरांत शर्माही करोडपती

नुकतेच जम्मू आणि कश्मीर संघाकडून रणजी पदार्पण करणाऱ्या विवरांत शर्माला आयपीएलने खूप मोठी संधी दिली आहे. केवळ दोनच सामने खेळलेल्या या नव्या दमाच्या अष्टपैलू खेळाडूला  20 लाखांची मूळ पिंमत असताना 2.60 कोटींना विकत घेण्याचे धाडस हैदराबादने दाखवले आहे.

इशांत शर्मासाठी दिल्लीने फक्त 50 लाख मोजले.

केन विल्यम्सनलाही दोन कोटींच्या मूळ किमतीत गुजरातने मिळविले.

शिवम मावीसाठी गुजरातने 6 कोटी मोजले

2 कोटींच्या जेसन होल्डरला 5.75 कोटी

 आदिल रशीदला 2 कोटींचा भाव

के. एस. भारतला 1.2 कोटींची पिंमत

अजिंक्य रहाणेला 50 लाखांच्या मूळ किमतीतच चेन्नईने घेतले.

यांना ही किंमत मिळाली

शकीब अल हसन कोलकाता (1.5 कोटी)

जो रुट          राजस्थान    (1 कोटी)

अॅडम झम्पा    राजस्थान (1.5 कोटी)

अकिल हुसेन    हैदराबाद    (1 कोटी)

लिटन दास     कोलकाता   (50 लाख)

डेव्हिड वेस     कोलकाता    (1 कोटी)

जोश लिटल      गुजरात   (4.4 कोटी)

मयांक डागर    हैदराबाद  (1.8 कोटी)

अमित मिश्रा     लखनौ    (50 लाख)

रिली रॉसो       दिल्ली   (4.6 कोटी)

काइली जेमिसन  चेन्नई      (1 कोटी)

विल जॅक्स       बंगळुरू   (3.2 कोटी)

मनीष पांडे       दिल्ली   (2.4 कोटी)