सत्ताधाऱ्यांचे वर्तन लोकशाहीला काळिमा फासणारे- अशोक चव्हाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी पक्षाचे वर्तन महाराष्ट्राचे नुकसान करणारे आणि लोकशाहीला काळिमा फासणारे असल्याची टीका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज केली. नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये काही महत्त्वपूर्ण निर्णय होणे अपेक्षित होते. महाराष्ट्राच्या दृष्टीने आज सीमा प्रश्न हा सर्वाधिक जिव्हाळ्य़ाचा व ज्वलंत प्रश्न ठरला आहे. कर्नाटक महाराष्ट्रावर कुरघोडी करू पाहते आहे. तेथील विधिमंडळामध्ये महाराष्ट्राविरोधात ठराव घेतले जातात. कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्राबाबत अवमानकारक भूमिका घेऊन महाराष्ट्राला हिणवणारे ट्विट करतात; परंतु या संपूर्ण विषयावर महाराष्ट्र सरकारची भूमिका अतिशय संशयास्पद आहे. त्यांनी गप्प बसून हे सहन करण्याची भूमिका घेतलेली आहे. कर्नाटकविरुद्ध एक शब्दही उच्चारला जात नाही. उलट महाराष्ट्राचे सरकार कर्नाटकचे समर्थन करीत आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे आक्षेपार्ह ट्विट फेक आहे, अशी बतावणी केली जाते. हे खेदजनक आहे. खरे तर महाराष्ट्राने त्यांचा प्रतिकार केला पाहिजे. सभागृहातील कामकाजाचा दर्जा खालवत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.