
>> वैश्विक
पूर्वीच्या काळी आपल्याकडे अन्न शिजवायला पिंवा पाणी साठवायला तांब्याची मोठमोठी तपेली असायची तसा तळाशी पसरट आणि वर निमुळता होत जाणारा आकार, वजन 25 टन. तळाशी रुंदी 5 मीटरची… हे वर्णन आहे नुकत्याच चंद्रभेटीवरून पृथ्वीवर सुखरूप परतलेल्या ‘ओरायन’चं. अर्टेमिस-1 हा अमेरिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अनेकदा रखडला. तो त्यातील हायड्रोजनच्या गळतीमुळे.
फ्लोरिडातील केप केनेडी अंतराळयान स्थानकावर अनेक दिवस उड्डाणासाठी तिष्ठत असलेलं हे यान अखेर 21 नोव्हेंबरला चंद्राच्या दिशेने झेपावलं आणि शास्त्रज्ञांनी सुटकेचा निःश्वास सोडला. याचं कारण तसंच होतं. 1969 ते 72 या काळात 12 चंद्रवीर अंतराळात धाडणाऱ्या अमेरिकेने नंतर ‘चंद्र’ हा विषय काहीसा बाजूला ठेवा होता; परंतु वैज्ञानिक संशोधनातील गती आणि प्रगती जेव्हा ‘कमर्शियल’ वापर करणाऱ्यांच्या नजरेत येऊ लागली तेव्हा इलॉन मस्कसारखे उद्योजक चंद्र-मंगळ पर्यटनाची स्वप्नं पाहू लागले. प्रत्यक्ष चंद्रपृष्ठावर उतरणे पिंवा चंद्राला अगदी जवळून फेरी मारून येणे अशी या संभाव्य पर्यटनाची योजना असेल. धनाढ्य लोकांना सुखाने चंद्रप्रवास घडावा यासाठीचा खटाटोप त्यातून सुरू झाला.
संशोधन करणाऱ्या संस्थांसाठी पैसा हवाच असतो. त्यातूनच अर्टेमिस मालिकेची कल्पना साकारली. यापैकी पहिलं अर्टेमिस-1 नोव्हेंबरात उडालं आणि त्याने ‘ओरायन पॅप्सूल’ अवकाशात नेली. ती चंद्रभ्रमण करून पृथ्वीवर पसरली. डिसेंबरच्या 12 तारखेला अमेरिकन वेळेनुसार सकाळी 11 वाजून 40 मिनिटांनी पॅलिपहर्नियाजवळच्या पॅसिफिक महासागरात ओरायनचं ‘स्प्लॅश डाऊन’ झालं! त्या वेळी आपल्याकडे साधारण रात्रीचे साडेबारा वाजले होते. (म्हणजे इथली 13 तारीख.) ते अवतरण टीव्हीच्या पडद्यावर थेट (लाइव्ह) पाहताना छान वाटत होतं. समुद्रात किनाऱ्यापासून 160 किलोमीटर अंतरावर एक महाकाय बोट उभी होती. बोटीच्या मागच्या बाजूला खाली असलेल्या जागेत ‘ओरायन’ ठेवण्याची (अडकवण्याची) व्यवस्था झाली होती. चार छोट्या बोटी, दूरवर सागरपृष्ठावर धडकणाऱ्या ‘ओरायन’ला मोठ्या बोटीपर्यंत ओढून आणायला सज्ज होत्या. ठरल्या वेळेप्रमाणे अवकाशात एक ठिपका दिसू लागला. चार प्रचंड फुगे (बलून) बांधलेलं ‘ओरायन’ पृथ्वीचा कक्षेत येऊन वेगाने आदळण्याच्या स्थितीत होतं. 25 टनाचा असा एखादा अशनी पृथ्वीवर कुठेतरी कोसळला असता तर त्याने उत्पात घडवला असता. परंतु ‘ओरायन’चं शेड्युल सेपंदानुसार ठरलेलं होतं आणि ते कोणत्याही अंतराळी यानाप्रमाणे पाण्यावरच उतरणार असल्याने धोका नव्हता. फक्त ‘ओरायन’ची प्रतीक्षा होती.
त्या महाबोटीच्या डेकवर उभे असलेले शेकडो आणि आमच्यासारखे टीव्हीवर ते दृश्य पाहणारे ‘एक्साइट’ झाले होते… आणि एका क्षणी ‘ओरायन’चं अंतराळी घर्षणाने तापलेलं ‘तपेलं’ धाडकन जलपृष्ठावर आदळलं! एकच जल्लोष झाला. वर बसवलेल्या बलुनमुळे ‘ओरायन’ पाण्यावर तरंगायला लागलं आणि आता त्याला मोठ्या बोटीवर आणण्यासाठी सज्ज झालेल्या नौका भक्कम दोरखंड घेऊन वेगाने त्याच्याकडे निघाल्या. त्या छोट्या बोटीतल्या कुशल तंत्रज्ञांनी काळ्याठिक्कर पडलेल्या ‘ओरायन’च्या बाहेरच्या बाजूला बसवलेल्या कड्यांमध्ये नॉयलॉनचे दोर अडकवले आणि संथ गतीने ते ढकलत (‘टो’ करत) मोठ्या बोटीकडे न्यायला सुरुवात केली. पॅसिफिक समुद्राच्या महाकाय लाटांमुळे डचमळणारं ‘ओरायन’ आस्ते कदम मोठ्या बोटीपाशी आणलं गेलं आणि ठराविक जागी त्याची घट्ट स्थापना झाली. 25 दिवस 10 तास 54 मिनिटं आणि 50 सेपंदांची यशस्वी अंतराळयात्रा करून आलेल्या ओरायनचे उत्साहात स्वागत झाले. ‘नासा’चे शास्त्र्ाज्ञ आनंदाने उद्गारले, ‘हे प्रचंड यश आहे.’ …कारण आतापर्यंत चंद्रावर माणूस जाऊन आलेला असला तरी ‘पर्यटकांना’ नेण्यासाठीची विशिष्ट तयारी करून गेलेलं हे यान होतं. त्याचं यश भावी काळातील अंतराळ पर्यटनाची नांदी ठरणार आहे. यावेळी त्यात माणसं नव्हती. पण माणसं असती तर त्यांच्यावर काय परिणाम झाला असता याची चाचपणी करण्यासाठी बसवलेले तीन पुतळे (मानवाकार मॅनेकीन) होते. त्यांचा ‘प्रमुख’ होता ‘पॅप्टन’ मूनकीन! पॅम्पोस हे नाव ‘नासा’च्याच अर्टरो पॅम्पोस या तज्ञ इंजिनीअरच्या नावावरून देण्यात आलं होतं. याशिवाय झोरा आणि हेल्गा हे त्याचे साथीदार, पुतळेही होते. सारी ‘मंडळी’ सुखरूप परतली.
…आता जेव्हा या माणसांच्या चांद्रयात्रा सुरू होतील तेव्हा त्यांना नील आर्मस्ट्राँग आणि एडवीन (बझ) ऑल्ड्रिन यांनी प्रथमच पाहिलेला चंद्र कसा दिसेल? तिथे त्याना पहिल्या ‘ईगल’ यानाचे अवशेष. अमेरिकेचा झेंडा, 73 देशांची नावं, युरी गागारिन आणि कॉमॉरॅव्ह या रशियन अंतराळवीरांसह जे अंतराळवीर अपघातात गेले त्यांच्या स्मृत्यर्थ ठेवलेली या दोन अंतराळवीरांच्या चेहऱ्याची मोठी नाणी, जागतिक शांततेचं प्रतीक म्हणून ठेवलेली ‘ऑलिव्ह’ची सोन्याची डहाळी आणि अंतराळवीरांच्या पायांचे (बुटांचे) ठसे दिसतील! त्याशिवाय चंद्रावरून आपल्याकडे संदेश पाठवण्यासाठी बसवलेला ‘ल्यूनार लेझर रिफ्लेक्टर’ही दिसेल. त्याच्यामुळेच चंद्र-पृथ्वी अंतराची अगदी यथायोग्य मोजणी करता आली. …तर असे हे मृग नक्षत्राच्या ओरायन नावाने चंद्रावर गेलेलं यान. त्याने घडवलेला यशस्वी इतिहास ही अंतराळ प्रवासाच्या भविष्याची नांदी आहे!






















































