खासदार जलील यांचे आरोप बिनबुडाचे, माफी न मागितल्यास अब्रुनुकसानीचा दावा करणार; सुभाष देसाई यांचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आपल्यावर भूखंड घोटाळ्याचा केलेला आरोप बिनबुडाचा असल्याचे शिवसेना नेते तथा माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले आहे. हा आरोप करताना त्यांनी कोणताही पुरावा दिलेला नाही. माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा हा प्रयत्न आहे. खासदार जलील यांनी हे निराधार आरोप त्वरित मागे घेऊन माझी माफी मागावी अन्यथा अब्रुनुकसानीचा तसेच नुकसान भरपाईचा खटला दाखल करण्याचा इशाराही शिवसेना नेते तथा माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिला आहे.