
वर्षाच्या प्रारंभी सातपैकी सहा कसोटींत दमदार विजय मिळविताना सलग विजयांचा चौकार ठोकणाऱया दक्षिण आफ्रिकेला आज सलग चौथ्या पराभवाची चव चाखावी लागली. ऑस्ट्रेलियाने अपेक्षेप्रमाणे बॉक्सिंग डे दुसऱया कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा डाव आणि 182 धावांनी दारुण पराभव करीत तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी मालिका विजयाची आघाडी घेतली. तसेच ऑस्ट्रेलियाने तब्बल 16 वर्षांनंतर मायभूमीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका जिंकण्यातही यश मिळविले. याआधी गेल्या 16 वर्षांत झालेल्या तीन मालिकांपैकी दोन मालिका आफ्रिकेने जिंकल्या होत्या, तर एक मालिका बरोबरीत सुटली होती. या विजयामुळे ऑस्ट्रेलियाचे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीतील स्थान जवळजवळ निश्चित झाले आहे.
आज ऑस्ट्रेलिया डावाने जिंकणार हे स्पष्ट होते आणि तसेच घडले. 386 धावांनी पिछाडीवर असलेल्या दक्षिण आफ्रिकेचा डाव तेंबा बुवामाने लांबवण्याचा अपयशी प्रयत्न केला. त्याने 65 धावांची खेळी करताना कायल वरेनबरोबर पाचव्या विकेटसाठी 63 धावा जोडल्या. पण ही जोडी फुटल्यानंतर कोणताही फलंदाज फार काळ टिकला नाही आणि फिरकीवीर नॅथन लायनने बवुमा आणि रबाडाला बाद करून दक्षिण आफ्रिकेचा डाव 204 धावांत संपवला आणि एक डाव 182 धावांनी दणदणीत विजय मिळविला.
16 वर्षांनंतर मायभूमीत जिंकले
ऑस्ट्रेलियाने 2005-06 नंतर प्रथम दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायभूमीत कसोटी मालिका जिंकली. आफ्रिकेविरुद्ध 2008-09 (2-1), 2012-13 (1-1), 2016-17 (2-1) च्या मोसमात त्यांना घरच्याच मैदानावर मालिका गमवावी लागली होती. अखेर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका पराभवाची मालिका ऑस्ट्रेलियाने यंदा संपुष्टात आणली. ऑस्ट्रेलियाने या वर्षी 11 कसोटी सामने खेळताना 7 सामन्यांत विजय मिळविले, तर केवळ सामन्यात त्यांना श्रीलंकेकडून डावाने हार सहन करावी लागली होती. 3 कसोटी अनिर्णीतावस्थेत सुटल्या होत्या.
संक्षिप्त धावफलक
द. आफ्रिका ः 68. 4 षटकांत सर्वबाद 189
ऑस्ट्रेलिया ः 91 षटकांत 3 बाद 386
द. आफ्रिका ः 68. 5 षटकांत सर्वबाद 204 (तेंबा बवुमा 65, कायल वरेन 33, थिऊनिस द ब्रुयन 28; नॅथन लायन 17-1-58-3 स्कॉट बोलॅण्ड 15-2-49-2).























































