काली मातेला तर दारूचे नैवेद्य… केतकी चितळेचे पुन्हा वादग्रस्त विधान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेत्री केतकी चितळे ही कायम तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. अनेकदा तिच्या सोशल मीडियावरून नेटकऱ्यांसोबत खडाजंगी उडत असतात. दरम्यान नववर्षाच्या निमित्ताने केतकीने एक पोस्ट शेअर केली असून त्याच्याखाली तिने केलेल्या एका कमेंटवरून ती वादात अडकली आहे.

केतकीने एक व्हिडीओ शेअर केला असून त्यात ती तिचा हातावरचा टॅटू दाखवतआहे. या व्हिडीओत तिच्या दुसऱ्या हातात दारुचा ग्लासही आहे. ते पाहून नेटकरी नाराज झाले असून त्यांनी तिच्यावर टीका केली. त्यावर एका नेटकऱ्याने लिहले आहे की ‘वाह दीदी… लोकांना सांगायचं इंग्रजी परंपरा पाळू नका… आणि आपण ढोसायची..!’ त्याच्या या कमेंटवर केतकीने रिप्लाय देताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ‘मी कधी म्हणाले इंग्रजी परंपरा पाळू नका? सोमरस म्हणजे वाईन. सनातन धर्मात दारू आहे. आमचे देव ही दारू पितात. काली मातेला तर दारूचे नैवेद्य असतो. तसेच काही शंकराच्या मंदिरात ही. . स्वतः ची संस्कृती शिका, हे मी नेहमी लिहिते व सांगते. फरक शिका’, असं केतकी चितळेने म्हटले आहे. केतकीच्या याच उत्तरानं नेटकरी संतापले आहेत.